सरकारी आणि खासगी क्षेत्रात रोजगाराची हमी देणारा हा कोर्स आहे. याचा कालावधी पंधरा महिने आहे. बारावी सायन्स पास विद्याथ्र्यांसाठी अ.भा.स्था.स्व. संस्थेच्या नवी मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर यासह इतर राज्यांमधील प्रमुख सेण्टर्सवर शिकवला जातो. भारत सरकारच्या अन्न सुरक्षाविषयक कायदा, फूड सेफ्टी अॅक्ट २००६ प्रमाणे फूड इन्स्पेक्टर होण्यासाठी बीएससी (अॅग्रिकल्चर)/बीफॉर्मा आणि विद्यापीठाचा फूड इन्स्पेक्टर डिप्लोमा पास असणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाला सौराष्ट्र विद्यापीठाची मान्यता आहे. मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शिक्षक आणि प्रयोगशाळा यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बारावीनंतर हा कोर्स केल्यास वरीलपैकी एक पदवी मिळताच फूड इन्स्पेक्टरची नोकरी मिळू शकते. ग्रॅज्युएट नसाल, परंतु डिप्लोमा इन फूड सेफ्टी अॅण्ड हायजीन डिप्लोमा केला असेल तरीही खासगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. हा डिप्लोमा केलेले विद्यार्थी फूड प्रोसेसिंग, मॅन्युफ्यक्चरिंग इण्डस्ट्रीज, हॉटेल्स, रेस्तराँ, रिसॉर्ट्स, फँक्टरीज, रेल्वे, एअरवेजमध्ये असिस्टण्ट क्वालिटी कण्ट्रोलर, मायक्रोबायोलॉजिस्ट, हायजीन असिस्टण्ट म्हणून काम करू शकतात. कोर्सनंतर फूड अॅनालिटिकल लॅबोरेटरीज किंवा रिसर्च सेण्टर्समध्ये लॅब असिस्टण्टची नोकरी करता येईल. फूड मॉल्स, फूड बाजार, केटरिंग सव्हिर्सेस आणि मिड डे मिल प्रोग्राममध्ये अन्नवाटप विभागामध्ये फूड सुपरवायझर्सचा जॉब हे पर्यायही आहेत.
डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर्स
हा हमखास नोकरी मिळण्यास उपयुक्त ठरणारा आणि बाहेरच्या संस्थांपेक्षा अतिशय माफक फीमध्ये करता येण्यासारखा कोर्स. डिप्लोमा इन सॅनिटरी इन्स्पेक्टर्स हा कोर्स बारावी सायन्सनंतर करता येतो. या कोर्सचा कालावधी एक वर्ष आहे. बारावी सायन्स किंवा दहावी पास विद्याथ्र्यांना सहा महिने कालावधी असणारा प्री-सॅनिटरी इन्स्पेक्टर्स कोर्स करावा लागतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर या संस्थेअंतर्गत सॅनिटरी इन्स्पेक्टर्स डिप्लोमा कोर्स पूर्ण करता येतो. नगरपरिषदा, पालिका आणि इतर सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, पंचतारांकित हॉटेल्स, अनेक खासगी क्षेत्रात स्वच्छता आणि आरोग्य संबंधित विभागांमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन
हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स आहे. सौराष्ट्र विद्यापीठाची मान्यता असलेल्या या कोर्सला ग्रॅज्युएट विद्याथ्र्यांना प्रवेश घेता येतो. कोर्सचा कालावधी एक वर्ष आहे. मुख्य सेंटरवर हा कोर्स उपलब्ध आहे. विद्याथ्र्यांना इण्टर्नशिप आणि प्रात्यक्षिकासाठी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये ठराविक कालावधीसाठी पाठवलं जातं. त्यांनी केलेले प्रोजेक्ट रिपोर्ट तज्ज्ञांकडून तपासून घेतले जातात. हॉस्पिटलमध्ये प्रशासन आणि व्यवस्थापन यांचं ज्ञान असलेल्या व्यक्तींची उणीव भरून काढण्यासाठी हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात आला
आहे.
बीएससी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
संस्थेत डीएमएलटी हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स सुरू आहे. आता बीएससी इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा डिग्री कोर्स सुरू केला आला आहे. या कोर्सचा कालावधी साडेतीन वर्षं आहे. किमान ४५ टक्के मार्कस मिळवून बारावी सायन्स पास तसंच दहावी पास आणि डीएमएलटी डिप्लोमा कोर्स केलेल्या विद्याथ्र्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येईल. त्यासाठी दोन वर्षं कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आपत्ती व्यवस्थापन (डिझास्टर मॅनेजमेण्ट)
आजच्या विद्याथ्र्यांसाठी नव्याने खुला झालेला करिअरचा हा आणखी एक पर्याय. यातला प्रमुख विषय म्हणजे फायर फायटिंग (अग्निशमन आणि प्रथमोपचार). अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही या क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यात अग्रेसर संस्था आहे. संस्थेने नॅशनल फायर अकादमी स्थापन केली आहे. देशभरात महत्त्वाच्या केंद्रात फायरमेन आणि सबफायर ऑफिसर्स कोर्स शिकवला जातो. संस्थेचे अनेक प्रशिक्षित विद्यार्थी नगरपालिकांच्या, उद्योगांच्या आणि ऑइल रिफायनरीच्या अग्निशमन विभागात नोकरीला आहेत. गुजराथमध्ये महिलांसाठीही आपत्ती व्यवस्थापन क्षेत्र खुलं करण्यात आलं आहे. काही सेंटरवर कॅम्पस इण्टरव्ह्यू आणि प्लेसमेण्ट्सही सुरू आहेत. त्याचप्रमाणे पॅरामेडिकल सव्र्हिसेसमध्ये प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी आणि पालिकांना मोठ्या संख्येने लागणा-या प्रशिक्षित कर्मचा-यांसाठी संस्थेने सरकारमान्यता मिळवून स्वतःची नर्सिंग अकादमी सुरू केली आहे. तिथल्या प्रशिक्षितांना नोक-या मिळवून देण्याचं काम करतात. संस्थेचे अनेक प्रशिणार्थी देशात परदेशात कार्यरत आहेत.
संपर्क - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्र्हमेंट), एम.एन. रॉय हनुमान डेव्हलपमेण्ट कॅम्पस, प्लॉट नंबर ६, गवर्नमेंट कॉलनीसमोर, बिल्डिंग नंबर ३२६, टीपीएस रोड नंबर १२, वांदे (पूर्व), मुंबई -४०००५१.