एम .ए. इन डेव्हलपमेन्ट - या अभ्यासक्रमामध्ये विकासविषयक धोरण, विकास प्रकल्पांची अंमलबजावणी व त्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व, जीवनस्तरमान व त्याचा विकास, पोषणपद्धती, विकासविषयक कायदे व त्यांची अंमलबजावणी या विषयांवर भर देण्यात येणार आहे. या दोन्ही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
शैक्षणिक अर्हता व अनुभव - अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. संबंधित क्षेत्रातील अनुभवी अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
निवड प्रक्रिया - अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवड ३६ परीक्षा केद्रांवर २४ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येईल.
शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती योजना- निवड झालेल्या उमेदवारांपैकी निवडक व गरजू उमेदवारांना त्यांची पात्रता व गरजेनुसार शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती प्रेमजी फाऊण्डेशनतर्फे देण्यात येईल.
अधिक महिती व तपशिलासाठी संपर्क - अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अझिम प्रेमजी फाऊण्डेशनच्या १८००२६६२००१ या विनाशुल्क दूरध्वनीवर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील अर्ज अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी, पिक्सेल पार्क , बी-ब्लॉक, पीईएस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉनिक सिटी, होसूर रोड, बंगळुरू-५६०१०० या पत्त्यावर
पाठविण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१३.