विविध परीक्षा अ) केंद्रीय संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्विस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात.
पूर्वी ज्या अभियांत्रिकी,वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होत नसे ते विद्यार्थी संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस.सी.) किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेला बसून आपले करिअर ठरवीत असत. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. किंबहुना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवीधरसुद्घा संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपला करिअरचा मार्ग बदलतात. लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या विविध परीक्षा अ) केंद्रीय संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्विस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात. उदा. आय.ए.एस. ज्याद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, सचिव, आयुक्त इत्यादी पदांवर जाता येते. आय.पी.एस. ज्याद्वारे जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्त, पोलीस प्रमुख, महासंचालक इत्यादी पदांवर काम करून पोलीस खात्यात करिअर करता येते. आय.आर.एस. ज्यामध्ये कस्टम एक्साइज रेल्वे, पोस्ट इत्यादी क्षेत्रात काम करता येते. आय.एफ.एस. ज्यामध्ये परदेशी दूतावास परराष्ट्र विभागात सेवा संधी. ह्या परीक्षां मध्ये यश मिळण्यासाठी वाचनाची आवड असावी. महत्वाचे मुद्यांचे टिपण काढण्याची सवय असावी. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा भरपूर मेहनत घेण्याची तयारी असावी. वरवर अभ्यास न करता सखोल वाचन हवे. परीक्षेचे तंत्र आणि मंत्र अवगत करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. ऐच्छिक विषय निवडतांना ज्या विषयात चांगले योग्य उत्तर देण्याची क्षमता आहे असेच विषय निवडावेत. मनन आणि चिंतनाची क्षमता वाढवावी. गटचर्चेमध्ये प्रभावी असावे. तोंडी परीक्षेसाठी आत्मविश्वास आणि विनयशीलता असावी.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|