MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

How to appear for an interview-

2/7/2013

2 Comments

 
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.

मुलाखत मंडळ - मुलाखतीसाठी मुलाखत मंडळामध्ये आयोगाचे अध्यक्ष/ज्येष्ठ सदस्य वरिष्ठ अधिकारी (पोलीस/इतर खाती)/सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ प्राध्यापक असतात. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक स्पर्धक असता. मुलाखत याचा शब्दशः अर्थ म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोरासमोर खुले करणे. मुलाखतीमध्ये विषयातील ज्ञानाऐवजी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीचा नेमका अभ्यास करताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू सादर करणे आवश्यक ठरते.
मुलाखतीतील घटक -उमेदवाराला मुलाखतीची तयारी करताना पुढील घटकांचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. यातील विशेषतः वैयक्तिक माहिती, पदांचा पसंतीक्रम, पदवीचा विषय, त्याचा दैनंदिन जीवनातील वापर, छंद, नोकरीचा अनुभव आणि भोवताली घडणा-या घडामोडी या घटकांची पुढीलप्रमाणे तयारी करावी लागते.
व्यक्तिगत माहिती - मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा बायोडाटाच पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वतःचे नाव, आई- वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.
वास्तव्य - विद्याथ्र्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टये यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
शैक्षणिक पाश्र्वभूमी - उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषतः पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी.
अभ्यासबाह्य गोष्टींमधील रस - उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील अभ्यासबाह्य बाबींतील रस हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्याथ्र्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्याथ्र्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशा रीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यू चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
वैकल्पिक विषय - यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी उमेदवाराने निवडलेल्या वैकल्पिक विषयासंदर्भात देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या विषयातील संकल्पना, विचार-सिद्धांत, विचारवंत, समकालीन आयाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
प्रत्यक्ष मुलाखतीस जाताना - मुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणा-या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबत चर्चा करता येईल. मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाताना पुढील गोष्टींकडे आवर्जून लक्ष पुरवावे.
प्रथम गोष्ट म्हणजे तुमचा पेहराव. कारण त्यावरून तुमची आवडनिवड, आचारविचार समजत असतात. तेव्हा पोषाख हा औपचारिक, साधा मात्र नीटनेटका असावा. स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वतःस शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी परिधान करावी. आपण कोणत्याही समारंभाला चाललेलो नाही, याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये, म्हणून मुलाखतीच्या नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचावे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते, तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर राहा. जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल, तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा. तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोला. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो. उत्तरे देताना मुलाखत मंडळातील सर्वाकडे पाहून उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरूनदेखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.
मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल तर तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.


2 Comments
KETAN
8/11/2013 05:43:45 pm

THANK YOU SIR

Reply
swarupa
27/5/2016 04:34:25 am

Thanx sir !

Reply



Leave a Reply.

    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by
✕