ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 25 नोव्हेंबर 2014
वेतनबँड: रु.9300- 34,800, 4300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते. एकूण वित्तलब्धी अंदाजे रु.21,752/-.
वयोमर्यादा - 19 ते 33 वर्षं (राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षं)
विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा
तीन टप्प्यात घेण्यात येते.
1) पूर्व परीक्षा - 100 गुण
2) मुख्य परीक्षा - 200 गुण
3) मुलाखत - 50 गुण
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी मर्यादीत उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते.
शैक्षणिक पात्रता -
मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर ही परीक्षा देऊ शकतात.पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला बसलेले विद्यार्थीसुद्धा पूर्व परीक्षा देऊ शकतील. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे.
पूर्व परीक्षा स्वरूप -
प्रश्नपत्रिका 1 असून, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असते. प्रश्नांची संख्या 100 असून, एकूण गुण 100 असतात. परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी माध्यमात असते. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा पदवीपर्यंतच्या अभ्यासावर आधारित असतो.
चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील.
पूर्व परीक्षा बदललेला अभ्यासक्रम
चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील नागरिक शास्त्र
- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन (प्रशासन), ग्रामव्यवस्थापन (प्रशासन)
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्रचा इतिहास भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) -पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या-उद्योगधंदे इ.
अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र बुध्दीमापन चाचणी व अंकगणित