डिस्टन्स एज्युकेशन आणि संस्था :
डिस्टन्स एज्युकेशन देणा-या संस्थाचा विचार केला असता राज्य पातळी, देश पातळी, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या विद्यापीठांचा विचार करणे आवश्यक ठरते. देश पातळीवर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ तर राज्य पातळीवर यशवंतराव मुक्त विद्यापीठ अशा संस्थांमार्पâत अनेकजण डिस्टन्स एज्युकेशनचा लाभ घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतात. या अशा दूर राहून घेतल्या जाणा-या शिक्षण प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून त्या त्या संस्थाकडून विद्याथ्र्यांना स्टडी मटेरिअल म्हणजेच वेगवेगळी पुस्तके पुरवली जातात. तसेच मार्गदर्शनासाठी काही तासिका देखील घेतल्या जातात. बहुतकरून या तासिका शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या वारीच घेण्याकडे कल जास्त असतो.
डिस्टन्स एज्युकेशनचे तोटे किंवा धोके :
डिग्री मिळवण्याच्या मोहामुळे विद्यार्थी संस्थेविषयी परिपूर्ण चौकशी करत नाहीत त्यामुळे अनधिकृत संस्थेच्या जाळ्यात ते अडकू शकतात. डिस्टन्स एज्युकेशनमुळे शिकत असलेल्या विषयासंबंधी सखोल अभ्यास होईलच याची शाश्वती देता येत नाही. नोकरीच्या बाबतीत डिस्टन्स एज्युकेशन करून डिग्री घेतलेल्यांना डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अर्थात अंगीभूत कौशल्यांच्या जोरावर विद्यार्थी त्यावर मात करू शकतो पण त्या बाबतीतली मानसिक तयारी करणे आवश्यक आहे.
इंटरनेट आणि डिस्टन्स एज्युकेशन
डिस्टन्स एज्युकेशनचे आणखी एक नवीन दालन म्हणजे इंटरनेट. इंटरनेटमुळे डिस्टन्स एज्युकेशन सुरळीत होऊ शकते असे आपण म्हणून शकतो. प्राध्यापकांनी तयार केलेल्या स्टडी मटेरीअलमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे लेक्चर्स किंवा अभ्यासक्रमाप्रमाणे सीडीज तयार करून किंवा ऑनलाइन संपर्कातून विद्याथ्र्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर डिस्टन्स एज्युकेशन घेत असताना या ई-लर्नींगचा मोठया प्रामाणावर फायदा होता दिसतो. मात्र यामध्ये विद्याथ्र्यांनी इंटरनेटच्या बाबतीत तांत्रिकदृष्टया अपडेट राहणे आवश्यक आहे. इंटरनेट डिस्टन्स एज्युकेशन आणि परीक्षा बरेचदा विद्यार्थी दूर राहून अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि परीक्षा मात्र ठरावीक नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन देतो तर आजकालच्या प्रणालीनुसार ऑनलाइनदेखील परीक्षा देण्याची सोय या डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत उपलब्ध झालेली आहे यामध्ये बहुतकरून वस्तुनिष्ठ प्रश्नाचा समावेश असतो.
डिस्टन्स एज्युकेशनचे फायदे :
अध्र्यावर राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि पुढे शिकू इच्छिणा-यांसाठी डिस्टन्स एज्युकेशनचा उपयोग होऊ शकतो. नियमित शिक्षण न घेऊ शकणा-या विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनमार्फत आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. इतर वेगवेगळे कोर्सेस किंवा जॉब करून शिकणा-यांसाठी वेगळा पर्याय. अशा प्रकारचे शिक्षण घेताना नोकरी करणे शक्य होते. मागे पडलेल्या किंवा नापास झालेल्या विद्याथ्र्यांना वर्ष वाया न घालवता शिकता यावे म्हणून डिस्टन्स एज्युकेशन हा एक पर्याय असू शकतो.