MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

Mahaonline - MPSC Exam and preparation

15/9/2013

12 Comments

 
गेल्या 10 वर्षांत प्रशासकीय सेवा परीक्षांविषयी जाणीव जागृती वाढल्यामुळे आणि अनेक विद्यार्थी आपल्या तयारीच्या जोरावर त्यात यशस्वी होऊ लागल्यामुळे आज स्पर्धापरीक्षा क्षेत्र हे एक आकर्षण केंद्र ठरले आहे. परिणामी, प्रशासकीय सेवा, त्या माध्यमातून प्राप्त होणारी नोकरीची शाश्वती, विविध सुविधा, सामाजिक स्थान याबरोबरच आव्हानात्मक करिअर आणि सामाजिक हस्तक्षेपाची संधी या घटकांमुळे विद्यार्थीवर्ग मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसून येतो.

तथापि, या स्पर्धा परीक्षांचा विचार करताना विविध माध्यमातून पुढे येणारी सकारात्मक बाजू जशी लक्षात घेतली जाते तशीच तिची आव्हानात्मक आणि जोखमीची बाजूदेखील लक्षात घेणे आवश्यक ठरते. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र लोकआयोगाच्या निकालानंतर मंजुनाथ नावाच्या विद्यार्थ्यांने अपयशामुळे निराश होऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली. या घटनेच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेकडे नव्याने वळणारे, सद्यस्थितीत तयारीच्या प्रक्रियेत असणारे, सर्व प्रयत्नांअंती शेवटी अपयशी ठरलेले विद्यार्थी व त्यांचे पालक आणि विविध स्वरूपातील मार्गदर्शक या सर्व संबंधितांनी स्पर्धा परीक्षेत आढळणारया या आव्हानात्मक व जोखमीच्या घटकाकडे तितक्याच लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही जोखीम काय आहे त्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल काय शेवटी अपयश आल्यास त्यास कसे सामोरे जायचे या महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करणे उपयुक्त ठरेल.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदाची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केंद्रीय पातळीवर ८॰॰ ते १० हजार तर राज्यपातळीवर ३ ते ५ हजार  एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात. म्हणजे व्यापक स्वरूपातील स्पर्धेमुळे अंतिमत: निवड होणा-या  विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अत्यल्प असते. नियोजित अभ्यास, जिद्द, चिकाटी या आधारे यश मिळवता येते, यात शंका नसली तरी, या व्यापक स्वरूपाच्या स्पर्धेची जाणीव असणे हे प्रत्येक विद्यार्थी, पालक व मार्गदर्शकांची जबाबदारी आहे. त्यामुळे या परीक्षांकडे वळण्यापूर्वी अथवा वळत असताना आपल्याकडे एखादा पर्याय असणे अथवा त्याचा विचार केलेला असणे अत्यावश्यक ठरते. एकदा या पर्यायाचा विचार केला की, मग आपली सर्व ऊर्जा या परीक्षांच्या तयारीत गुंतवणे अधिक सोयीस्कर ठरते. अन्यथा या परीक्षांत अपयश आले आणि आपण पर्यायाचा अजिबातच विचार केलेला नसेल तर विद्यार्थी निराश होण्याचीच शक्यता असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेलाच सर्वस्व मानता कामा नये. म्हणजे, यात यश प्राप्त झाले तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो आणि या परीक्षेत अपयशी ठरलो तर आपले जीवनच निरर्थक आहे, अशा रीतीने स्पर्धा परीक्षेचा विचार करणे धोकादायक आहे. यातून आपण आपलेच खच्चीकरण करण्याची शक्यता अधिक आहे. वस्तुत: विद्यार्थी सर्वस्व पणास लावून उमेदीची काही वर्षेया परीक्षांचा अभ्यास करतात. मात्र तरीही पदरी आलेल्या अपयशाला सामोरे जाणे, अत्यंत कठीण असले तरी, त्याचा समर्थपणे स्वीकार करावा लागतो.

काही विद्यार्थी क्षमता असून आणि प्रयत्न करूनही अपात्र ठरतात, यास अनेक घटक कारणीभूत असतात. म्हणूनच आपल्या बाबतीत असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची जाणीव असणे संयुक्तिक ठरते. थोडक्यात यूपीएससी-एमपीएससी म्हणजे जीवन नव्हे याचे भान ठेवून आपण ठरवलेल्या कालमर्यादेत या परीक्षांचा प्रभावी अभ्यास करण्यावर लक्ष देणे साहाय्यभूत ठरेल.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भातील आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांने आपल्या आयुष्यातील किती वर्षे यासाठी राखीव ठेवावीत, हा होय. खरे पाहता एक वर्षांचा ११-१२ तासांचा नियोजित व परीक्षाभिमुख अभ्यास ही या परीक्षेची किमान गरज आहे, हे लक्षात येते. त्यानंतर प्रत्यक्ष
परीक्षा प्रक्रियेचे एक वर्ष अशी एकूण पूर्ण दोन वर्षे या परीक्षांसाठी निर्धारित करावीत. दोन वर्षांचा अभ्यास आणि एका संपूर्ण परीक्षेचा अनुभव हे या परीक्षेसाठी किमान प्रयत्न मानता येतील. या प्रयत्नात यश प्राप्त झाले तर प्रश्नच नाही. मात्र, अपयश आले तर या टप्प्यावर एका बाजूला स्पर्धा परीक्षा देताना, पर्यायी करिअरची सुरुवात करणे उपयुक्त ठरते.


12 Comments
parmeshwar kamble link
29/9/2013 03:52:14 pm

mpsc ha abeas karm intrnet war taklleamule amhe abri ahot

Reply
Sandy
13/10/2013 07:34:20 pm

thanks.mpsc

Reply
Ganesh
7/11/2013 10:13:19 pm

i want Teacher job

Reply
snehal
28/3/2014 05:09:45 pm

thanks for good guidence

Reply
Veerkumari
22/6/2014 12:47:34 am

Dear Sir ,
I want to ask you about Mpsc age limit means which date MPSC will consider .Its depends upon 1 August 2015 or after 3 months from exam date ll declared?

Reply
Neha Chitte
2/7/2014 03:56:15 am

Nice guidance.

Reply
sachin patil
21/7/2014 03:57:44 pm

very nice. guidance.

Reply
santosh s patil
30/7/2014 01:49:09 am

thanks for very nice guidance sir

Reply
Tushar
30/7/2014 11:01:24 am

Thanks...

Reply
Seema More
20/10/2014 02:45:50 pm

THANKS SIR

Reply
THANKS SIR link
26/5/2015 10:29:00 pm

THANKS SIR

Reply
nitin pawar link
8/6/2016 01:24:30 am

betar mpsc

Reply



Leave a Reply.

    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by Create your own unique website with customizable templates.