प्रत्यक्ष कार्याचा अनुभव
कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासक्रमात १५ महिन्यांचे व्यवस्थापन प्रशिक्षण एखाद्या कंपनीत जाऊन घेणं सक्तीचं असतं, मात्र ही कंपनी `इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया'कडे नोंदणीकृत असली पाहिजे किंवा कंपनी सेक्रेटरीच्या हाताखाली काम करणं गरजेचे आहे.
या पदाच्या काही महत्त्वाच्या जबाबदा-या
कॉर्पोरेट कायद्याअंतर्गत आर्थिक आणि कायदेशीर बाबींना कंपनी सेक्रेटरी जबाबदार असतो. या कायद्याअंतर्गत कंपनीची सर्व प्रक्रिया चालवण्याची जबाबदारी त्याची असते. विशेष म्हणजे कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचा कायदेशीर प्रमुख असतो. कंपनीच्या सर्व कायदेशीर बाबी तो पाहत असतो.
विशेष कौशल्ये
कंपनी सेक्रेटरीला कंपनीच्या वरिष्ठ वर्तुळात वावरावे लागत असल्याने हे पद विशेष जबाबदारीचं आहे. कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता, कायद्यातील तरतुदीची जाण, भरपूर कष्ट करण्याची तयारी, तसेच मानसिक ताणाचे व्यवस्थापन करण्याचं कौशल्य कंपनी सेक्रेटरी पदावर काम करणा-या व्यक्तीकडे असायला हवं.
नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी
कंपनी सेक्रेटरी हे व्यवस्थापनातील पद आहे. संचालक मंडळाचा सल्लागार, कंपनी अंतर्गत कायदेशीर तज्ज्ञ, कॉर्पोरेट प्लॅनर आदी भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. कंपनीत कायदा अधिकारी, अनुपालन अधिकारी (कम्प्लायन्स), कायदेशीर सल्लागार, कायदा प्रतिनिधी आणि सॉलिसीटर आदी पदांवर काम करता येते. तसेच कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतंत्र व्यवसायही करता येऊ शकतो. परदेशातही या व्यवसायाला मोठया संधी आहेत. या पदासाठी वेतनाचे पॅकेज आणि इतर सोयीसुविधा भरभक्कम असतात. बुद्धिमान, हुशार व चिकाटीने अभ्यास करणा-या विद्याथ्र्यांनी या अभ्यासक्रमाचा विचार नक्कीच करावा.