परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत -
सामान्य ज्ञान व आर्थिक चालू घडामोडी – या घटकात ग्रामप्रशासन (स्थानिक स्वराज्य संस्था), भारताची राज्यघटना, भारताचा इतिहास, समाजसुधारक, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान, मूलभूत पायाभूत गणित व तक्ता सारणी, बुद्धिमत्ता चाचणी, मार्केटिंग कौशल्य व संगणक ज्ञान अजमावले जाते.
आय.बी.पी.एस.द्वारे घेतल्या जाणार्या लिपिक संवर्गातील परीक्षा - वयोमर्यादा- वरील दिलेल्या एस.बी.आय. क्लार्क परीक्षेप्रमाणे. शैक्षणिक अर्हता – कोणतेही पदवीधर. (10+2+3 पॅटर्न), लेखी परीक्षा - एकूण प्रश्न 250 गुण 250, वेळ - अडीच तास, स्वरूप- बहुपर्यायी, माध्यम- इंग्रजी व हिंदी. अभ्यासक्रम -बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी भाषा चाचणी, पायाभूत मूलभूत गणित एकूण प्रश्न, सामान्य चाचणी व बँकिंग क्षेत्रातील ज्ञान एकूण प्रश्न, संगणक चाचणी. (वरील विषयांच्या प्रश्नांची संख्या 50 आणि गुण 50)
या घटकांचा अभ्यासक्रम हा एस.बी.आय. लिपिकला दिलेल्या अभ्यासक्रमानुसार असतो, याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 गुण वजा केले जातात. या परीक्षेला कट ऑफ स्कोअर दिला जात असतो. आय.बी.पी.एस.द्वारे सामूहिक लेखी परीक्षेचे दिलेले स्कोअरकार्ड एक वर्षांकरिता वैध असते. अंतिम निवड ही मुलाखत व लेखी परीक्षेच्या एकूण गुणांमधून होत असते.
एस.बी.आय. प्रोबेशनरी ऑफिसर/ स्पेशलिस्ट ऑफिसर परीक्षा अलीकडेच 393 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी एस.बी.आय.तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार 2014-15 मध्येही अंदाजे तीन ते चार हजार पदे प्रोबेशनरी ऑफिसर व इतर पदे भरण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा मानस आहे. या पदासाठी आवश्यक ठरणारी अर्हता पुढीलप्रमाणे आहे -
शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेची पदवीधर (खुल्या प्रवर्गासाठी 65 टक्के व इतर प्रवर्गासाठी 60 टक्के)
वयोगट - 21 ते 30 वर्षे.
शासननिर्णयानुसार मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल. ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात 200 गुणांची दोन तास कालावधीची बहुपर्यायी परीक्षा िहदी व इंग्रजी या द्विभाषिक माध्यमातून घेतली जाते. यामध्ये इंग्रजी भाषा चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (विशेषत: बँकिंग संदर्भातील), मूलभूत गणित, तक्ता सारणी व सांख्यिकी प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येक विषयाची प्रश्नसंख्या 50 आणि गुण 50. एक तास कालावधीच्या घेण्यात येणार्या पारंपरिक चाचणीत इंग्रजी भाषाज्ञान (50 गुण) तपासले जाते. त्यात उतारा, पत्रलेखन, सारांशलेखन, निबंधलेखन व एखाद्या मुद्दयाची मांडणी अपेक्षित असते.
दुसर्या टप्प्यात गटचर्चा, ग्रामीण गटचर्चा, मुलाखत आणि अनुभव याआधारे परीक्षार्थीना गुण देण्यात येतात.
लेखी परीक्षा, गटचर्चा आणि मुलाखत यांत मिळून खुल्या प्रवर्गासाठी 40 टक्के व मागासप्रवर्गासाठी 35 टक्के गुणमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसे झाल्यास अंतिम निवडसाठी परीक्षार्थी ग्राह्य मानला जातो.
आय.बी.पी.एस. प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेट ट्रेनीज
19 राष्ट्रीयीकृत बँका व इतर आर्थिक संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेट ट्रेनीज पदभरतीसाठी आय.बी.पी.एस.तर्फे सामूहिक लेखी परीक्षा घेतली जाते. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे.
शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेचा पदवीधर (खुला 60 टक्के व मागासप्रवर्ग 55 टक्के), संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक. लेखी परीक्षा 200 गुणांची असून दोन तास अवधीची आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी उत्तरे असे असून इंग्रजी व हिंदी माध्यमातून ही परीक्षा देता येते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी भाषा ज्ञान, पायाभूत मूलभूत गणित व तक्ता सारणी प्रश्न, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (बँकिंग क्षेत्रासंदर्भातील), संगणकज्ञान यांचा समावेश असतो.
मुलाखत 100 गुणांची असून खुल्या प्रवर्गातील विद्याथ्र्यांना 40 टक्के व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळणे आवश्यक असते. स्कोअरकार्डनुसार परीक्षार्थीना मुलाखतीसाठी विविध बँकांच्या गरजेनुसार बोलावले जाते.
निवड प्रक्रिया - लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांना 80 टक्के तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के व्हेटेज मिळून अंतिम निवड होते. आय.बी.पी.एस. (स्केल वन, टू, थ्री ऑफिसर), गट-ब ऑफिस साहाय्यक आय.बी.पी.एस.कडून स्केल वन, टू, थ्री अधिकारी व गट-ब ऑफिस साहाय्यक पदासाठी सामूहिक लेखी परीक्षा घेतली जाते. ज्यात 62 प्रादेशिक, ग्रामीण बँकांचा समावेश असतो.
वयोमर्यादा - ऑफिसर स्केल थ्री (21 ते 40 वर्षे), स्केल टू (21 ते 32 वर्षे), स्केल वन (18 ते 28 वर्षे). शासननिर्णयानुसार मागास – इतर मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
शैक्षणिक अर्हता - गट ब ऑफिस साहाय्यक - कोणत्याही शाखेचा पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणकज्ञान आवश्यक. ऑफिसर (स्केल वन) - अॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अॅनिमल हजबंडरी, व्हेटेरनरी सायन्स, अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग, अॅग्रिकल्चर मार्केटिंग अॅण्ड कॉर्पोरेशन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स व अकाऊंटन्सी यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणकज्ञान आवश्यक.
ऑफिसर (स्केल टू) - या पदासाठी अनुभव दोन वर्षे गरजेचा असतो. त्यात स्केल- टू स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी एक वर्ष अनुभव गरजेचा. कोणत्याही शाखेचा पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणक ज्ञान आवश्यक.