अणु उर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या ५ वर्षीय एमएस्सी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट एनईएसटी २०१३साठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जदारांनी बारावीची परीक्षा विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. किंवा ते या परीक्षेस बसलेले असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा
२० वर्षे राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना अणुउर्जा आयोगाच्या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट २०१३ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक अशा ४० परीक्षा केंद्रावर घेण्यात येऊन त्या आधारे उमेदवारांना अणुऊर्जा आयोगाच्या ५ वर्षांच्या एमएस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह वेबसाईटवर अथवा
चीफ को-ऑर्डिनेटर, एनईएसटी
२०१३,एनआयएसईआर, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स कॅम्पस सचिवालय मार्ग, भुवनेश्वर ७५१००५ या पत्यावर पाठवावे.