MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

Scope in banking career-करिअरचं महान दालन: बँकिंग

22/6/2013

4 Comments

 
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
बँका विस्तारताहेत. त्याबरोबरीने त्यातील स्टाफची प्रगती होते आहे. चंदा कोचरसारखी एक कर्तृत्ववान स्त्री बँकर आयसीआयसीआय व देशातील बलाढय खासगी बँकेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेली आहे. एकूण काय इथे प्रत्येकाला आपली महत्त्वाकांक्षा फुलवायला आणि कुवतीनुसार व्यवस्थापनाच्या सर्वोच्चस्थानी जायला संधी उपलब्ध आहे. तात्पर्य काय की बँकिंग हे करिअरचं महान दालन आहे. मात्र त्याकरिता तुम्ही केवळ बँकेत नोकरी करताहेत एवढं पुरेसं नाही. बँकेत नोकरी मिळाली की आपसूक शिडया मिळतील व प्रमोशन मिळेल अशा भ्रमात कोणीच राहू नये. कारण स्पर्धा तीव्र आहे. जे बँकेत आहेत त्यांनी स्वतःला `अपग्रेड' करण्याचा सातत्याने विचार करावा. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच आयआयबीएफ या बँकिंग क्षेत्रातील एकमेव व्यावसायिक परीक्षा व प्रमाणपत्र घेणा-या देशव्यापी संस्थेकडे आज अनेक नवनवे अभ्यासक्रम आहेत. आज बँकांत अनेक प्रकारचे जॉब्स उपलब्ध आहेत. तुमच्याकडे केवळ जनरल स्टाफसाठी लागणारं कार्यकौशल्य असून चालणार नाही. कारण नुसते गर्दीतले शिलेदार राहिलात तर किंमत नाही. तुमच्याकडे काहीतरी विशेष म्हणजे स्पेशलायझेशन हवे. आजचा जमाना हा स्पेशलायझेशनचा आहे. रुटीन कामे करणारा बाबुवर्ग आता इतिहास जमा झालाय. कामगिरीप्रमाणे आणि जबाबदारी पेलण्याच्या कुवतीनुसार पदं आणि प्रमोशन निर्माण केली जात आहेत. गुणवान कर्मचा-याला बढतीचं दार उघडून देण्यास व्यवस्थापनं तत्पर आहेत. संधी तर अनेक आहेत. प्रयत्न करणारे अनेक आहेत. आपल्याला त्या सर्वामध्ये टीकायचं असेल तर आपलं कौशल्य वाढवायला हवे. पूर्वी फॉरेन एक्सचेंज म्हटलं की विदेशीविनिमय, ट्रॅव्हलर्स चेक्स किंवा एक्स्पोट-इंम्पोर्टचे व्यवहार इतके मर्यादित होते. आता ते क्षेत्र व्यापक झालंय, त्यात गुंतागुंतीची प्रॉडक्टस् आहेत. डेरिव्हेटिव्हजसारखी नवी साधने प्रचलीत आहेत. बँका नवीन उत्पादने बाजारात आणताहेत. अशा वेळी आपण जर आपल्याला अद्ययावत केले, नवनवे विषय जाणून घेतले तर आपण त्या कामांसाठी लायक-पात्र होऊ शकू बँकिंगमध्ये ट्रेझरी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, डेरिव्हेटिव्हज, ट्रेड फायनान्स अशी क्षेत्रे विस्तारताहेत. रिस्क मॅनेजमेंट- जोखम व्यवस्थापन हा तर विषय एव्हरग्रीन आहे. फायनान्समध्ये स्पेशलायझेशन करून तुम्हाला त्यातील एखाद्या उप-शाखेत प्रावीण्य मिळवता येईन. फॉरेन एक्स्चेंज डीलर, मनी-मार्केट डीलर, पोर्टफोलिओ मॅनेजर, वेल्थ मॅनेजमेंट, एचएनआय म्हणजे हायनेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, फॉरेन ट्रेड, ऑडिट , क्रेडिट ऑडिट असे अनेक विभाग आहेत. ज्याबाबतचं मूलभूत ज्ञान मिळवून- म्हणजे एखादा डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम करून तुम्ही सिद्ध झालायत, तर योग्य संधी मिळताच तुम्हाला `अनुभव' संपादन करता येईल. त्याकरिता आयआयबीएफकडे ट्रेझरी, ट्रेड फायनान्स असे विविध विषयांचे छोटे छोटे अभ्यासक्रमही आहेत. आपण केवळ दहा-बारा तासांची नोकरी करू, प्रवासाने दमून जाऊ आणि वीकएंडला धम्माल करू! असा टिपिकल अ‍ॅटीटयूड ठेवला, तर काहीच होणार नाही. नोकरी करताकरता असे काही डिप्लोमाज् करून स्वतःला `कॉम्पिटंट' करत `अपग्रेड' कसं करता येईल? याचा तुम्हीच विचार करायला हवा. तुमच्या घरचे किंवा ऑफिसातले तुमच्या भवितव्याचा विचार का करतील? आता कोणीही पुढचे प्रमोशन आयते आणून देणार नाही. तुम्हाला ते तुमच्या मेरिटच्या, कामाच्या हुशारीवर मिळवावे लागेल. त्याकरिता व्यावसायिक शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव व व्यवस्थापनात पारंगत असणे या सर्व बाबतीत आपल्याला चारचौघांपेक्षा
वेगळे आहोत, हे दाखवावे लागेल. केवळ घरीबसल्या लिटिल चॅम्प्सचे कौतुक न करता त्यांचे टॅलेन्टस, मेहनत व एकाग्रता या गुणांकडे लक्ष द्या, नव्हे आता तर त्यांचे अनुकरण करण्याची वेळ आलेली आहे. बँकिंगमध्ये पुढे जाण्यासाठी आयआयबीएफने जे.ए.आय.आय.बी. व
सी.ए.आय.आय.बी. अशा परीक्षा ठेवलेल्या आहेत. बँकिंग क्षेत्राची व्यवस्थित माहिती देऊन, त्यात तुम्हाला थिअरी व प्रॅक्टिकली तरबेज करण्याचे शिक्षण या कोर्सद्वारे मिळते. तज्ज्ञ व्यक्तींनी तयार केलेली पुस्तके, ऑन-लाईन शिक्षणाची सोय, व्हच्र्युअल क्लासरूमद्वारे बँकिंगमधील तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे देशभर प्रसारण असे उपक्रम नियमित क्लासरूमच्या बरोबरीने घेतले जात आहेत. आता तर आयबीए म्हणजेच इंडियन बँक असोसिएशन या आपल्या देशातील बँक व्यवस्थापनाच्या शिखर संस्थेने आयआयबीएफच्या कोर्सेसना प्राधान्य द्या, अशी सर्व बँकांना सूचना दिलेली आहे. त्यामुळे या परीक्षा हे तुम्हांला बँकेतील नोकरीचे प्रवेश पत्र ठरू शकणार आहे. सीएआयआयबी दिल्यानंतर तुम्ही ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट वा ट्रेड फायनान्स अशा एखाद्या तुम्हाला झेपणा-या, आवडत्या विषयात `विशेष' अभ्यास करू शकता. लंडन
बँकिंग इन्स्टिटयूटची बँविंâग परीक्षा देऊन तुम्ही ग्लोबल- आंतरराष्ट्रीय बँकिंगमध्ये पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा ठेवू शकता.


4 Comments
TUSHAR MOTILAL CHAVAN
11/11/2013 05:56:20 pm

sir i am B pharma graduate.now i am doing job of sales and marketing from last 4 years. but now i am interested in banking sectors.sir i want guidence from you sir.

Reply
naresh mokal
29/6/2014 01:31:18 am

Dear sir,
my age has been expire so i definatelly sugestion in my son.....

Reply
rajendra
2/8/2015 01:50:31 am

Sir pls send clerk exam book name is my mail I'd pls sir

Reply
ashpak kotwal
10/1/2016 09:42:42 am

respected sir ,I am 12th sci. pass in first class..now i am doing job of micro finance from last1 years. but now i am interested in banking sectors.sir i want guidence from you sir.

Reply



Leave a Reply.

    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by Create your own unique website with customizable templates.