सामाजिक क्षमतेची परिमाणे -
अ) भावनिक बुद्धिमत्ता- इतरांच्या भावना समजून घेणे व स्वतःवर नियंत्रण ठेवण, यावर भावनिक बुद्धिमत्ता ठरत असते.
ब) सामाजिक बुद्धिमत्ता- परस्परांमधील सुदृढ नातेसंबंध राखणे आणि त्यानुसार योग्य कृती करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता.
क) सवयी आणि वर्तणूक- मोठयांचे ऐकून स्वतःची वागणूक सुधारण्याचा प्रयत्न, सकारात्मक किंवा नकारात्मक वर्तन, इतरांशी सहानुभूतीने वागणे.
ड) सामान्य जागरूकता- दैनंदिन जगण्यासाठी लागणारी सुरक्षितता आणि काळजी म्हणजेच परिस्थितीबद्दलची जागरूकता असते.
बौद्धिक क्षमतेची परिमाणे-
अ) गती आणि अचूकता- ठराविक बौद्धिक क्रिया अचूकपणे व जलदपणे करण्याची क्षमता, बारकाईने गोष्टी पाहण्याचे कौशल्य, शैक्षणिक खेळ व कोडी अचूकपणे सोडवणे.
ब) निरीक्षण शक्ती- विस्तृतपणे एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे, फरक ओळखणे, हरवलेला भाग शोधणे, चित्रांमधील फरक ओळखण्याची क्षमता यातून व्यक्त होते.
क) समानता- दोन वेगवेगळ्या गोष्टींमधील, वस्तूंमधील, कल्पनांमधील समान गुणधर्म शोधण्याची क्षमता.
शारीरिक व मानसिक क्षमतेची परिमाणे-
अ ) क्रीडा दृष्टिकोन- यात मैदानी तसेच इतर खेळांविषयी आवड.
ब) आरोग्यविषयक- यात वैयक्तिक स्वच्छतेची गरज असते. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छतेविषयी जागरूकता, शारीरिक व्यायामाची आवड.
क ) नेतृत्वगुण- यात विशेषतः संघबांधणीसाठी आवश्यक असणारे गुण, मानसिक कणखरपणा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व करण्याची क्षमता.
अभ्यासपूरक क्षमता-
अ ) श्रवण- लक्षपूर्वक ऐकून स्मरणात ठेवण्याची क्षमता, कुटुंबातील वडिलधा-या व्यक्तीकडून सांगितलेल्या गोष्टी, घटना लक्षपूर्वक ऐकून नंतर मित्रांना सांगण्याचे कौशल्य.
ब) वाचन, आकलन- वाचलेली माहिती समजून घेणे, शब्दार्थाची उजळणी आणि त्यानुसार कृती करण्याची क्षमता.
क )सामान्य ज्ञान क्षमता- इतिहास, भूगोल, अर्थकारण, समाजशास्त्र, प्रशासन, राजकीय घडामोडी, चालू जागतिक घडामोडी आणि इतर विषयांमध्ये असलेले ज्ञान, याद्वारे विद्याथ्र्यांची स्पर्धात्मक परीक्षांत उत्तीर्ण होण्याची क्षमता लक्षात येत असते.
ड) शाब्दिक क्रम- अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी शब्द आणि कल्पनांना योग्य क्रमाने लावण्याची क्षमता. योग्य वयात योग्य पातळीवर विद्याथ्र्यांचे गुणसंवर्धन होणे महत्त्वाचे असते. त्यांची बलस्थाने आणि उणिवा, संधी आणि धोके यांचे मापन झाल्याने त्यांची बलस्थाने जोखता येतात. अॅप्टिटयूड टेस्ट अर्थात विद्यार्थी मूल्यमापन चाचणी पालकांना व शिक्षकांना मुलांमधील क्षमता ओळखण्यास मदत करतात.