प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया - वर उल्लेखिलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच टोफेल परीक्षेत किमान गुण मिळवणे गरजेचे आहे. अर्जदारांनी संबंधित वेबसाइटवर हा अर्ज भरायचा आहे. ही अर्जप्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ज्या अर्जदारांना शिष्यवृत्तीची गरज आहे त्यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०१३ आहे. तर इतर अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०१३ आहे. विद्यापीठाकडून मिळणा-या शिष्यवृत्ती व साहाय्यवृत्तींची संख्या मर्यादित आहे. विकसनशील देशांतील उच्चशिक्षित व कुशाग्र शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या अर्जदारांना हे अर्थसाहाय्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती अथवा साहाय्यवृत्तीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. अर्जदाराला अर्जाबरोबरच दोन तज्ज्ञांची शिफारसपत्रे विद्यापीठाला मेल करावी लागतात.
अभ्यासक्रम आणि अर्थसाहाय्य - यूएनयू मधील उपरोक्त अभ्यासक्रम हा इंग्रजीत असून यासाठी जपानी भाषेवर प्रभुत्व असण्याची अजिबात गरज नाही. विद्याथ्र्यांना वर्षांच्या शेवटी आपला संशोधन प्रबंध विद्यापीठाला सदर करावा लागतो.
संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) विद्यापीठ असल्याने या पदवीचा अभ्यासक्रम साहजिकच भविष्यातील अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दयांचा वेध घेऊन तयार केलेला आहे हे जाणवते. यूएनयूमधील या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची टयूशन फी दरवर्षी १०००० डॉलर्स म्हणजे
सुमारे साडेपाच लाख रुपये आहे. अर्जदारांना जपान फाउंडेशन फॉर यूएनयू कडून शिष्यवृत्ती व साहाय्यवृत्तींचे अर्थसाहाय्य दिले जाते.
महत्त्वाचे दुवे – http://isp.unu.edu/
http://www.jfunu.jp/english/