करिअर टेस्ट तुम्ही कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी मार्गदर्शन करते. काही प्रश्नांच्या उत्तरातून तुम्ही एखादं करिअर निवडणं आहे की नाही, हे त्यातून समजतं. योग्य अशा करिअरची निवड म्हणजे आयुष्यात यश मिळण्याची खात्री असते. याचाच अर्थ आपलं संपूर्ण आयुष्य आनंदात घालवण्याची किल्ली तुमच्या करिअर निवडीमध्ये आहे. विशेष म्हणजे आता तर दहावीपासूनच आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, याविषयी आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला लागले आहेत. अनेकदा आईवडिलांनी निर्णय घेतल्याप्रमाणे वाटचाल केली जाते. त्यामुळे पुढे जाऊन यश मिळेल याची खात्री नसते. शिवाय अनेकदा आपण निवडलेलं क्षेत्र न आवडणारं आहे, हे खूप उशीरा समजतं. त्यामुळेच करिअर कोणत्या क्षेत्रात करावं यासाठी करिअर टेस्ट हा पर्याय कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल.
शैक्षणिक यश मिळविण्यासाठी अभ्यास किती वेळ करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे अधिक महत्वाचे आहे. अभ्यासाचा मानसिक ताण निर्माण होऊ नये तसेच शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील अपयश येत असते. दिवसरात्र अभ्यास करणे महत्वाचे नसून एकाग्र चित्ताने आणि निग्रहाने अभ्यास करणे गरजेचे असते.
अझिम प्रेमजी विद्यापीठातर्फे शिक्षण व विकास विषयांतर्गत एम.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१३-२०१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जपानमधील टोकियोस्थित युनायटेड नेशन्स युनिव्र्हसिटी (यूएनयू) मध्ये २०१३ च्या पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या विद्यापीठात सस्टेनेबिलिटी, डेव्हलपमेन्ट अॅण्ड पीस या विषयांत एम.एस्सी. करण्यासाठी जपानमधील जपान फाउंडेशनकडून विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
यावर्षी अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाचीच सामायिक प्रवेश परीक्षा ( MT-CET) होणार आहे. अर्थात या परीक्षेला फक्त इयत्ता बारावीचाच अभ्यासक्रम असेल. तरीही इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमातील संकल्पनांचा वापर उत्तरं शोधताना होणार आहे. Physics आणि Chemistry चा पेपर १०० गुणांचा असेल आणि त्यासाठी ९० मिनिटे वेळ असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जाणार नाहीत.
अलीकडे सिव्हील सव्र्हिसेस परीक्षेस बसणा-या मराठी भाषिक उमेदवारांची संख्या फार मोठया प्रमाणात वाढली आहे. सिव्हिल सव्र्हिसेस एक्झामिनेशन (नागरी सेवा परीक्षा) असे असून या परीक्षेद्वारे एकूण २८ प्रकारची विवध पदे भरली जातात. ही विविध पदे खालीलप्रमाणे आहेत.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|