सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते.
अधिकारी पद
ग्रुप `ए'मध्ये सी.बी.आय. डायरेक्टर, स्पेशल डायरेक्टर, अतिरिक्त डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर,डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, सीनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, अँडिशनल सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस इत्यादी पदं असतात. यांमधील बहुतेक सर्व पदं भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) व वर उल्लेख केलेल्या तसंच खात्यांतर्गत पदोन्नतीद्वारे भरली जातात.
टेक्निकल स्टाफ
प्रिन्सिपल सिस्टिम अँनालिस्ट, सीनिअर सिस्टिम अँनालिस्ट, प्रोग्रमर्स, असि. प्रोग्रमर्स, सिनीअर लायब्ररी अँण्ड इन्फॉम्रेशन ऑफिसर, असिस्टंट लायब्ररी अँण्ड इन्फॉम्रेशन ऑफिसर, डेप्युटी प्रिन्सिपल इन्फॉम्रेशन ऑफिसर आदी पदं टेक्निकल स्टाफअंतर्गत येतात.
लॉ ऑफिसर्स
लिगल अँडव्हायजर, अतिरिक्त लिगल अँडव्हायजर, डेप्युटी लिगल अँडव्हायजर, सीनिअर पब्लिक प्रॉसिक्युटर, पब्लिक प्रॉसिक्युटर, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, अशी पदं येतात.
मिनिस्ट्रेरियल केडर
स्टेनो ग्रेड-ए, स्टेनो ग्रेड-बी, ऑफिस सुपरिटेंडंट, स्टेनो १, हेडक्लर्क , क्लर्क व अकाऊंटंट, स्टेनो ग्रेड- डी, अप्पर डिव्हिजन क्लर्वâ, लोअर डिव्हिजन क्लर्क, क्लर्क आदी पदं यात येतात. वरीलपकी काही पदं स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेच्या माध्यमातूनही भरली जातात.
एक्झिक्युटिव्ह रँक
यामध्ये सी ग्रेडमध्ये इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर, हेडकाँस्टेबल, काँस्टेबल अशी पदं येतात. वरील पदांमधील सब-इन्स्पेक्टर या पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारा परीक्षा घेऊन भरती केली जाते.
कम्बाईन्ड ग्रँज्युएट परीक्षा
सब-इन्स्पेक्टर (सीबीआय), दिल्ली पोलीस व अन्य काही शासकीय पदांसाठी ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. प्रिलिमिनरी, मुख्य परीक्षा व मुलाखत असे परीक्षेचे तीन टप्पे असतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
पोलिस उपअधीक्षक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे श्रेणी १च्या विविध पदांसाठी घेतल्या जाणा-या परीक्षेमार्फतच पोलीस उपअधीक्षकांची निवड केली जाते.