MPSC-Mahaonline-Mpsconline
आता या मुलाखतींऐवजी उमेदवारांमध्ये ग्रुप डिस्कशनचा पर्याय सगळे जण वापरतात. त्यासाठी निर्धारित अधिकारी एक तर या उमेदवारांबरोबर चर्चेला बसतात विंâवा मग या ग्रुप डिस्कशनचं चित्रीकरण करून ते नंतर पाहिलं जातं. या चित्रीकरणांचा वापर करून मग योग्य तो उमेदवार निवडला जातो.
ग्रुप डिस्कशनसाठी बसण्याची आपली मुद्राही फार महत्त्वाची ठरते. टेबलावर दोन्ही हात ठेवून बसणं टाळावं. एका हातावर रेलून बसणं किंवा आपली खुर्ची अगदी मागे ओढून फार रेलून बसल्यास, आपल्याला या चर्चेत रस नाही असा त्याचा अर्थ होतो, त्यामुळे तेही टाळावं. बोलतानाचा स्वर मृदू असावा. बोलणं अगदी स्पष्ट असावं. फार हळूही बोलू नये. अनेक ठिकाणी मोठया कॉन्फरन्स हॉलमध्ये असे ग्रुप डिस्कशन आयोजित केले जातात. त्या ठिकाणी आपल्याला बोलायला माईक दिले जातात. त्यांच्या अगदी जवळ जाऊन बोलल्यानं आवाज फाटू शकतो. त्याचीही काळजी घ्यावी. भाषा अगदी साधीसोपी व ओघवती असावी. दोन भाषांचं मिश्रण टाळावं. काही शब्द आपण आपल्या नकळत वापरत असतो त्यांचा अभ्यास करून ते टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्यासमोर दिलेल्या पॅडवर दुसयांच्या बोलण्यातले मुद्दे लिहून घ्यावेत. पुढे त्या मुद्दयांचा समाचार घेता येतो. सहसा दुसरी व्यक्ती बोलत असताना त्याचं वाक्य मध्येच तोडू नये. आपल्या बोलण्याकडे इतरांचं लक्ष आहे ना तेही अधूनमधून तपासून पाहावं. आपल्याला आता ग्रुप डिस्कशनला बसायचं आहे, त्यामुळे आपणच इतरांपेक्षा शहाणे कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. समोरच्याला मान देण्याचा आपला गुणही त्यातून दिसला पाहिजे. आपला मुद्दा मांडताना त्यातून आपला या विषयाचा आधीचा अभ्यास, आपलं समाजभान व ज्या परिस्थितीत ग्रुप डिस्कशन सुरू आहे ती परिस्थिती व तो विषय यांचा विचार करायला हवा. बोलताना अधूनमधून केलेले एखाद्दुसरे विनोद आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग दाखवून जातात.
ग्रुप डिस्कशनला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना अभिवादन तर करावंच, त्याचबरोबर ते संपल्यावरही सगळ्यांना उद्देशून या चर्चेमुळे आनंद वाटला अशी वाक्यंही पेरावीत. बोलताना आपल्या शब्दांनी कुणाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. मला हा तुमचा मुद्दा पटत नाही किंवा पटला नाही हे स्पष्टपणे, पण गोड शब्दात बोलून दाखवा. एखाद्याचा मुद्दा चांगला असेल तर त्याला दाद द्या.
आपल्याकडे या चर्चेची सूत्रं आपोआप आली पाहिजेत याचा विचार करावा. त्यामुळे आपला प्रभाव चांगला पडतो.