2. कल चाचणीच्या निष्कर्षांवरून करिअरचा निर्णय घेणा-यांपैकी अनेकजणं त्या करिअरसाठी करावे लागणारे कष्ट आणि अंगातील क्षमता याचा अंदाज घेत नाहीत. मग करिअरच्या पुढच्या पार्यांयावर वाढलेला अभ्यासक्रम आणि काठिण्यपातळी त्यांना झेपत नाही. मग अपयश येऊ लागतं आणि निवडलेल्या करिअरचा पश्चात्ताप होऊन ते बदलावंसं वाटू लागतं.
3. निवडलेला अभ्यासक्रम आवडण्यासाठी उत्तम शिक्षक, पोषक वातावरण, मित्र मैत्रिणींची मदत, स्पर्धा, कुटुंबियांचा पाठिंबा, प्रयोगशाळा, वाचनालय या सा-याचीही गरज असते. शिवाय अनुभव मिळण्याची संधीही लागते. हे सगळं नसेल तर मग शिकण्यातील रस कमी होत जातो. हे सगळं जिथे असेल तिथला अभ्यासक्रम आपण स्वीकारावा असं वाटू लागतं.
4. अभ्यासक्रम निवडताना तो पूर्ण केल्यावर मिळणार्या संधींची विद्याथ्र्यांना नीट कल्पना नसते. मग अभ्यासक्रम सुरु झाल्यावर सिनिअर विद्याथ्र्यांकडून, शिक्षकांकडून त्या क्षेत्रातील स्पर्धा व त्यातील संधी यांची वास्तव जाणीव विद्याथ्र्यांना होऊ लागते. अशा वेळी भ्रमनिरास झाल्याने करिअर बदलावेसे वाटू लागते.
5. निवडलेला अभ्यासक्रम सुरळीत सुरु असतानासुद्धा एखाद्या नव्या किंवा माहित नसलेल्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली की तो अभ्यासक्रम अधिक आकर्षक किंवा योग्य वाटू लागतो. सध्याचा अभ्यासक्रम सोडून तो निवडावा असे वाटू लागते.
6. कुटुंबाच्या आर्थिक अडचणी, शारीरिक अक्षमता, अपघातांमुळे येणा-या शारीरिक अडचणी यामुळेही विद्याथ्र्यांना चालू असलेले अभ्यासक्रम पूर्ण करणं शक्य होत नाही. मग ते पर्यायी अभ्यासक्रमाचा विचार करू लागतात.
ही सर्व कारणं विस्ताराने लिहिण्याचं कारण म्हणजे यावर्षी तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर वरीलपैकी कोणत्या कारणामुळे करीत आहात, हे आधी नक्की करा. मगच निर्णय घ्या. पहिल्या कारणामुळे तुम्ही करिअर बदलत असाल तर मेंदूची कल चाचणी करून घ्या. त्यातून सुचविलेल्या क्षेत्रांपैकी ज्या क्षेत्रात यशस्वी होण्याची तुमची क्षमता आणि आवड आहे, त्याची निवड करा. आपल्या चुकांचा विचार मागे टाकून नव्या क्षेत्रात उत्साहाने, पॉझिटिव्ह मनाने प्रवेश करा.
दुसर्या कारणामुळे करिअर बदलण्याचा विचार करीत असाल तर थोडं थांबा. आत्मपरीक्षण करा. आपण निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या अपेक्षा आपण का पूर्ण करू शकत नाही, याची कारणे शोधा. कदाचित तुमच्याकडे मुलभूत ज्ञानाची कमी असेल. ते मिळविण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमचे प्रयत्न अपुरे असतील. ते वाढवण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाचे वेळापत्रक नीट आखून घ्या. अजून एक वर्ष प्रयत्न करा. तरीही नीट जमत नाही असं वाटल्यास बदलाचा विचार करा.
तिस-या कारणामुळे करिअर बदलत असाल तर ज्या महाविद्यालयात तुमचा अभ्यासक्रम अधिक चांगला शिकविला जातो. जिथे अधिक सोयी, सुविधा, स्पर्धा आहे अशा ठिकाणी प्रवेश घ्या. कदाचित तुम्हाला पुन्हा त्याच अभ्यासक्रमाची गोडी वाटू लागेल.
चौथ्या कारणामुळे अभ्यासक्रम बदलत असाल तर आहे तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अपेक्षित संधी मिळण्यासाठी किती गुण मिळवावे लागतात, कोणती अधिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात याची माहिती घ्या. कदाचित या क्षेत्रातील संधी कमी होतायत असा सल्ला देणारी व्यक्ती स्वत: अशा कमतरतांमुळे मागे पडली असेल. त्या दूर केल्यास तर तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते.