दिशादर्शक म्हणजे या पोस्टला आवश्यक अशी कोणती स्किल्स तुमच्याकडे आहेत. (जसे सेल्समधील जॉबसाठी कम्युनिकेशन, पेशन्स, सेल्फ मोटिव्हेशन लागते) त्या विरूद्ध, जसे तुमच्याबद्दल काही सांगा ( तुम्हाला जे हवं, ते आणि हव्या त्या पद्धतीने सांगू शकता. हा पहिला प्रश्न असू शकतो. यात तुमचं क्वालिफिकेशन आणि कामाच्या सवयीबद्दल सांगा आणि हे करिअर व कामाशी संबधित ठेवा.)
अंदाजदर्शक , म्हणजे समजा काम करत असताना एखादा प्रॉब्लेम आला , तर तुम्ही त्याला कसं तोंड द्याल? ( या प्रश्नाचं उत्तर देत असताना माहिती गोळा करणं, त्याची गरज ठरवणं अथवा मूल्यमापन करणं, माहितीचा अग्रक्रम ठरवणं, सल्ला घेणं, इतर पर्यायांचा विचार करणं, निर्णय घेणं, निर्णयाबद्दल माहिती देणं, येणार्या रिझल्टवर लक्ष ठेवून त्यांचा अहवाल घेणं आणि गरज पडल्यास बदल करणं, अशा स्वरूपाचे उत्तर.) वर्तणूक दर्शवणारे प्रश्न म्हणजे, असा एखादा प्रसंग सांगाल का, ज्याबद्दल तुम्हाला स्वत:बद्दल अभिमान आहे. ( यात कोणतंही उत्तर चूक अथवा बरोबर नाही. मात्र, उत्तर देताना , त्याचा ज्या पोस्टसाठी अर्ज केला आहे, त्याच्याशी संबंधित असा प्रसंग सांगितला, तर जास्त उपयोगी ठरतं.) अथवा तुमच्यातले दोष सांगा. याचं उत्तर देताना नकारात्मक किंवा खूप विस्ताराने देणं चुकीचं ठरतं आणि माझ्यात काहीच दोष नाही, हे उत्तर गर्विष्ठपणाचं ठरतं. त्यामुळे काही लहानसे दोष सांगताना ते तुमचं शक्तीस्थळ आहे, असं समोरच्याला वाटलं पाहिजे. मात्र, मी खूप काम करतो, असं चुकूनही सांगू नका. त्या ऐवजी मी माझ्या कामाच्या क्वालिटीबाबत अती चिकित्सक आहे, असं सांगा.
तणावदर्शक प्रश्नांमध्ये, तुम्हाला सिंह आवडतो का वाघ? वगैरे प्रश्न येऊ शकतात. काही वेळा असे प्रश्न तुमची परीक्षा घेण्यासाठी विचारले जातात. याचं उत्तर शांतपणे विचार करून द्या, जसे मला सिंह आवडतो; कारण त्याचा रुबाब आणि ज्या प्रकारे ते एकत्र राहतात.
यानंतर अनेकदा कंपनीबाबत प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये आमच्या कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा याच कंपनीत काम करावं असं का वाटतं? याचं उत्तर देताना कंपनीबद्दल माहिती असणं खूपच जरुरीचं असतं आणि केवळ कंपनी चांगली असं सांगण्याऐवजी ती का चांगली आहे, याचं उदाहरण द्या.