अणु उर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या ५ वर्षीय एमएस्सी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट एनईएसटी २०१३साठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
अणु उर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणा-या ५ वर्षीय एमएस्सी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट एनईएसटी २०१३साठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखती मध्ये पुढील गोष्टी तपासल्या जातात.
१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस) २.क्रिटिकल पॉवर ऑफ अॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती. ३.स्पष्ट आणि तार्कीक स्पष्टीकरण. ४.परीक्षणातील समतोल. ५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता. ६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता. ७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी. वाढत्या उद्योगांमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात दुवा निर्माण करण्याचे काम इण्डस्ट्रिअल सायकॉलॉजिस्ट करतात. या इण्डस्ट्रीतील जागा पहाता सायकॉलॉजिस्टसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत
मोठमोठी स्वप्नं अनेक जण बघतात, मात्र ती पूर्ण कशी करायची, हे आपल्याला नेमक समजत नाही.त्यातून नैराश्य येतं. नैराश्यामुळे कमकुवतपणा येतो आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. कुठलंही काम आपण एकाग्रतेने करू शकत नाही. नोकरदार असू, तर नोकरीच्या ठिकाणी जाण्याचं मन होत नाही, मात्र ऑफिसला जाण्याशिवाय पर्यायही नसतो. अशा वेळी सर्वप्रथम मनाची मरगळ दूर करायला हवी तरच आपलं स्वप्न, ईप्सित गाठता येणं शक्य आहे.यासाठी काय करता येईल ते पाहूया. गुन्हे अन्वेषणाचं काम करण्याची अनेकांची इच्छा असते. सी.बी.आय.मध्ये जाण्यासाठी काय करावं, याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आपल्या मध्ये असते.
सी.बी.आय.ची स्थापना १९६३ मध्ये झाली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, सरकारी नोकर व उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार, दहशतवाद, बॉम्बस्फोट, माफिया, अंडरवल्र्ड आदी बाबींमध्ये तपास करण्याचं काम सी.बी.आय. करतं. सी.बी.आय.मध्ये विविध प्रकारे भरती केली जाते. सर्वसामान्य जनतेचं रक्षण करणारा, गुंडाराज-भ्रष्टाचार या विरोधात लढणारा आणि त्याचवेळी स्वतःच्या करियरचा ग्राफ उंचावणारा असा पोलीस अधिकारी समाजाला हवा असतो.
खलनिग्रहणाय सदरक्षणाय हे ब्रीदवाक्य जपणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची आज समाजव्यवस्थेला नितांत गरज आहे. किरण बेदी, जे.एफ. रिबेरो यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांनी स्वतःच्या करियरसोबतच समाजाचं ऋणही फेडलेलं आहे. पोलीस अधिकारी बनण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशाच काही करियर मार्गाची ओळख करून घेणार आहोत. पुर्वपरीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक उमेदवाराची मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेणं शक्य नसल्याने या पूर्वपरीक्षेतून हुशार, सर्वगुणसंपन्न आणि सगळ्या क्षेत्राचं ज्ञान असलेल्या उमेदवाराला निवडलं जातं. या पूर्वपरीक्षेची माहिती करून घेऊया. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात.
पदव्युत्तर विधी अभ्यासक्रम (एलएलएम) आता एक वर्षांचा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने परवानगी दिली असून, या शैक्षणिक वर्षांपासून (२०१३-१४) या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. नशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटच्या स्वरूपात बदल होत आहे. यापूर्वी परीक्षेचा तिसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपात घेतला जात असे. मात्र, यापुढील काळात तिस-या पेपरसह ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ
करिअर टेस्ट तुम्ही कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी मार्गदर्शन करते. काही प्रश्नांच्या उत्तरातून तुम्ही एखादं करिअर निवडणं आहे की नाही, हे त्यातून समजतं. योग्य अशा करिअरची निवड म्हणजे आयुष्यात यश मिळण्याची खात्री असते. याचाच अर्थ आपलं संपूर्ण आयुष्य आनंदात घालवण्याची किल्ली तुमच्या करिअर निवडीमध्ये आहे. विशेष म्हणजे आता तर दहावीपासूनच आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, याविषयी आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला लागले आहेत. अनेकदा आईवडिलांनी निर्णय घेतल्याप्रमाणे वाटचाल केली जाते. त्यामुळे पुढे जाऊन यश मिळेल याची खात्री नसते. शिवाय अनेकदा आपण निवडलेलं क्षेत्र न आवडणारं आहे, हे खूप उशीरा समजतं. त्यामुळेच करिअर कोणत्या क्षेत्रात करावं यासाठी करिअर टेस्ट हा पर्याय कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|